Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

वाळूउपसा करणार्‍या 25 लाखांच्या बोटी उद्ध्वस्त

Share

महसूल पथक व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुका हद्दीतील अजनूज, आर्वी, गार गावाच्या शिवारात भीमानदी पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा करणार्‍या तीन फायबर व तीन लोखंडी अशा 25 लाख रुपये किंमतीच्या सहा बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई शनिवार (दि. 21) स्थानिक गुन्हे शाखा व श्रीगोंदा महसूल पथकाने केली आहे.

याबाबत माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना गोपनीय माहिती मिळाली, श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदी पात्रात अजनूज, आर्वी, गार गावाच्या शिवारात काही इसम यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूउपसा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, रोहित मिसाळ, बाळू पवार, विश्वास बेरड, कमलेश पाथरुट, मच्छिंद्र बर्डे, संदीप दरंदले, सागर ससाणे, संभाजी कोतकर यांनी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांना व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन वेगवेगळी पथके तयार केली.

या पथकाने अजनूज, आर्वी, गार गावाच्या शिवारात भीमा नदी पात्रात खात्री केली असता काही इसम यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळूउपसा करत असलेले दिसले. ते पोलीस पाहताच बोटी सोडून पळून गेले. परंतु त्या ठिकाणी वाळू उपसा करणार्‍या तीन फायबर व तीन लोखंडी अशा 25 लाख रुपये किंमतीच्या सहा बोटी पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट करून उडवून दिल्या आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!