Friday, April 26, 2024
Homeनगरवाळूतस्करांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

वाळूतस्करांवर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा येथील गावठाणजवळ घोड नदी पात्रात अनधिकृतपणे वाळू उपसा करणार्‍या तस्करांवर छापा टाकत श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. यात ट्रॅक्टरसह वाळू असा एकूण 4 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त माहिती मिळाली होती. सदरची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस नाईक संतोष फलके, पोलीस शिपाई प्रताप देवकाते, प्रकाश मांडगे, पोलीस किरण बोराडे, सचिन मस्के हे पथक सरकारी वाहनाने सांगवी दुमाला शिवारात घोड नदी पात्रात जाऊन छापा टाकला. यावेळी एक ट्रॅक्टर वाळूने भरत असताना नदी पात्रात मिळून आला. ट्रॅक्टर वरील चालकाला पोलिसांच्या पथकांची चाहूल लागताच त्याने सदर ठिकाणाहून उसाच्या शेतामध्ये अंधाराचा फायदा घेऊन पसार होऊन पळून गेला. श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीचा व त्यामध्ये भरलेल्या वाळूचा जागीच पंचनामा करून जप्त केले.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सचिन मस्के यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरच्या अज्ञात चालक व मालक यांचे विरुद्ध गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई संतोष फलके करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या