Type to search

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात वाळूू तस्करांवर मोठी कारवाई

Featured सार्वमत

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात वाळूू तस्करांवर मोठी कारवाई

Share

स्थानिक गुन्हे शाखा : 44 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात खैरी, वाकी नदीपात्र शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाळू तस्कारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 11 आरोपींसह 8 ट्रॅक्टर आणि ट्राली, वाळू असा 43 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जामखेड तालुक्यातील खैरी, वाकी नदीपात्र शिवारात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोन पंचासह या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही मजूर नदीपात्रातून टॅक्टर ट्रालीत वाळू भरत असल्याचे सापडले. यावेळी 11 आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले असून 4 आरोपी फरार झाले आहेत.

पकडलेल्या आरोपीत तुकाराम गोपाळघरे (वाकी), भानुदास गोपाळघरे (नागोबाची वाडी), गेणश जगताप (वाकी), नितीन जगताप (वाकी), दत्ता डोके (खर्डा), राम भोसले (खर्डा), सुरज भुते (खर्डा), सोमेश्‍वर सोरटे (वाकी), नामदेव जोरे (खर्डा), महेश डोके (खर्डा), नामदेव जोरे (खर्डा), रावसाहेब सुरवसे (खर्डा), मदन गोल्हेकर (खर्डा), विजय सावंत (वाकी), भिमराव गोपाळघरे (नागोबाची वाडी) यांचा समावेश आहे. या आरोपीविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने देण्यात आली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!