सुधारणासह 5 कोटी 98 लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक महासभेत मंजुर

मिळकतींचे सर्वेक्षण, आकारणीच्या संगणकीकरणास प्राधान्य

0

नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी 1799.30 कोटी खर्च व अपेक्षित खर्च 1793.32 कोटी गृहीत धरूण 5.98 कोटी रूपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर केले.

हे अंदाजपत्रक योग्य सुधारणांसह मंजुर करण्यात आल्याची घोषणा महापोर रंजना भानसी यांनी केली. दरम्यान आयुक्तांनी स्थायीकडे 1410 .07 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते त्यात 389.23 कोटीची वाढ स्थायीने सुचविली.

याप्रसंगी उपमहापौर प्रथमेश गिते, आयुक्त अभिषेक कृष्णा, नगरसचिवांसह सर्वच खात्याचे प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कल 95 मधील तरतुदींनुसार आयुक्तांनी सादर केलेल्या जमा खर्चाच्या आकडेनुसार कलम 96 अन्वये स्थायीने अंदाजपत्रक त;यार केले होते. त्यात सन 2017-18 या वर्षासाठी अपेक्षीत जमा व खर्च गृहीत धरण्यात आला.

या अंदाजपत्रकाची विशेष बाब म्हणजे शहरातील नागरिकांकवर कोणत्याही प्रकाररची घरपटटी, पाणीपटटी दरवाढ या आर्थिक वर्षात करण्यात आलेली नाही. करांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी घरपटटी व पाणीपटटी व इतर करांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मिळकतींचे सर्व्हेक्षण व आकारणीचे पूर्ण संगणकीकरण करण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील होर्डींग्जचे सर्व्हेक्षण करून जाहीरातींपासून महापालिकेस 20 कोटींचे उत्पन्न मिळेल असा अंदाज या अंदाजपत्रकात मांडण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील 31 प्रभागात नगरसेवकांना विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी 40 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील विविध महत्वाचे रस्ते बांधणे व काँक्रीटीकरण करण्यासाठी 94 कोटी 95 लाख रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

नाशिकमधील समाजमंदीर, अभ्यासिका, वाचनालय सभामंडप तसेच नाशिकरोड येथे नाटयगृह बांधण्यासाठी 34.27 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. उद्यानात नवीन खेळणी व बेंचेस बसविण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेचे दवाखाने, रूग्णालये यात औषधे खरेदी व उपकरणे देखभाल दुरूस्तीसाठी 3 कोटी 50 लाखांची तरतूद या अंदाजपत्रकात आहे. पथदिप, एलईडीसाठी 31 कोटी 58 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय उत्पन्नवाढीसाठी विविध उपाय सुचविण्यात आले आहेत त्यात मनपा क्षेत्रातील खुल्या जागा, ट्रक टर्मिनस व इतर जागा भाडेतत्वावर देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेता कॅनडा कॉर्नर, व्दारका, यशवंत मंडई, महात्माफुले मार्केट, ट्रक टर्मिनस, जुने पंचवटी विभागीय कार्यालय, निलगीरी बाग, टाउन हॉल, कुलकर्णी गार्डन , फाळके स्मारक आदी बीओटी तत्वावर देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

नदी संवर्धनाबाबत नाशिक शहरातील गोदावरी, नंदीनी, वाघाडी नदी स्वच्छतेबाबत व सुशोभिकरणाबाबत स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याबाबत काही अंशी सूचना करण्यात आलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

*