सरकारच्या नियंत्रणाअभावी दूध उत्पादक भरडला जातोय!

जागतिक दूध दिन : शेतकरी संघटनेचे अनिल देठे यांच्याशी संवाद

अहमदनगर | Ahmednagar

सध्या करोना स्थितीचा अपवाद वगळता अन्य वेळीही दूध उत्पादकाला त्याच्या योग्य मोबदला मिळत नाही. अनेक संघ आणि खासगी क्षेत्रातील दूध कंपन्यांनी तर पिळवणूक सुरू ठेवली आहे. सरकारचे नियंत्रण नसल्याने त्यांचे फावले आहे. दूध उत्पादन व मागणी यांचे प्रमाण व्यस्त आहे.

राज्याला गरज असलेले दूधही आपण उत्पादित करत नाहीत. तरीही अतिरिक्त दूधाची ओरड करून शेतकर्‍यांना फसविले जाते. कृषी विद्यापीठाने शेतकर्‍यांना 37 रूपये दर दिला जावा, अशी शिफारस केली होती. आम्ही 32 ते 35 रूपयांची मागणी करतो. मात्र ती देखिल दिली जात नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे अनिल देठे यांनी केला आहे. जागतिक दूध दिनानिमित्त सार्वमत संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com