‘उम्मीद’-फाॅर बेटर टुमाराे : नटराज पंडित गाेपीकृष्ण जयंती महाेत्सव
संवाद कट्टा

‘उम्मीद’-फाॅर बेटर टुमाराे : नटराज पंडित गाेपीकृष्ण जयंती महाेत्सव

अवनी गद्रे यांनी गुंफले पहिले पुष्प

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरातील किर्ती कला मंदिराकडून नटराज पंडित गाेपीकृष्ण जयंती महाेत्सव यंदा जगभर आॅनलाईन साजरा केला जात आहे. कराेना संकटाने सर्वत्र लाॅकडाऊन असले, तरीही आपल्या कलेच्या प्रवाहाला, उर्जेला व विचारांना कुणीही लाॅकडाऊन करू शकत नाही यासाठी या महोत्सवाची सुरुवात आजपासून पुढील दोन दिवस करण्यात आली आहे.

दररोज सायंकाळी साडेसहा वाजता किर्ती कला मंदिराच्या फेसबुक लाईव्ह पेजवर हा कार्यक्रम जगभर लाईव्ह पहायला मिळत आहे.

या महाेत्सवाच्या आयाेजनाची जबाबदारी रेखाताई यांनी किर्ती कला मंदिराच्या युवा नर्तिकांकडे सोपविली आहे.

महाेत्सवाचे पहिले पुष्प आज (दि. १७) राेजी अवनी गद्रे यांनी गुंफले. अवनी हिने आदिती नाडगाैडा -पानसे यांच्याकडे नृत्यशिक्षण घेतले आहे.

अवनीने कृष्णायन, एकीचे बळ, आम्ही मराठी, बंदिश यासह अनेक कलाकृतींमध्ये भूमिका केल्या. अकराव्या वर्षी तिला भारत सरकारची शिष्यवृत्तीही मिळाली आहे. खजुराहाे, कालाघाेडा, नाट्यांजली या भारतातील महाेत्सवांबराेबरच चायना, काेरिया, मलेशिया व इस्त्राईल येथील महाेत्सवांतही सहभाग घेतला आहे.

या महोत्सवातील कलाविष्काराला नेटकरयांनी भरघोस प्रतिसाद देत कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून दाद दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com