उलगडली प्रतिभावंत बालकांची दुनिया

बालदिनानिमित्त विशेष सार्वमत संवाद कट्टा
उलगडली प्रतिभावंत बालकांची दुनिया

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आपले छंद जोपासत कलागुणांचा विकास करणार्‍या बालकांनी आपल्या कलागुणांची चुणूक ‘सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमात दाखविली.

देशाचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त रविवारी बालदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त बालकांशी संवाद रंगला. कार्यक्रमात व्याख्याता प्रथमेश विशाल वर्धावे (वक्तृत्व), कु. ईश्वरी रविंद्र नाईक (गायन), कु. मृणाल राजेंद्र देसाई (काव्यलेखन), आणि निरंजन ज्ञानेश गवले (व्हिडीओ क्रिएटर) हे शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले.

या बालमित्रांनी आपल्या सादरीकरणातून कलेची झलक दाखविली आहे. यावेळी या प्रतिभावंतांनी आपल्या कलागुणांचा परिचय तर दिलाच, सोबतच त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली. बालकांशी प्रा. ज्ञानेश गवले यांनी संवाद साधला तर अतिष देसर्डा यांनी चित्रीकरण केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com