‘सार्वमत संवाद कट्टा’ : बदलते शिक्षण, शिक्षक आणि समाज

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षण क्षेत्रात कितीही बदल घडत असले तरी शिक्षक हा या व्यवस्थेचा मुख्य आधार आहे. शिक्षकच समाजाच्या संस्काराचा कणा म्हणूनही कार्यरत आहे. त्यामुळे त्याचा आदर कमी होणार नाही, असा विश्वास ‘सार्वमत संवाद कट्टा’ या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला.

शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले होते. बदलते शिक्षण, शिक्षक आणि समाज या चर्चेत पुणे विभागाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या सहसचिव प्रिया शिंदे, अहमदनगरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रमाकांत काठमोरे, हिंगोलीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) परशुराम पावसे, संगमनेर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता महादेव वांढरे सहभागी झाले. संदीप वाकचौरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

शिक्षण आणि शिक्षक या घटकापुढे अनेक अडचणी आहेत, हे मान्य करावे लागेल. पण या अडचणींवर मात करण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे. शिक्षकाला सन्मानाची आपल्या समाजाची परंपरा आहे. आजही आपण ती जपून आहोत. काही अपवाद घडतात, मात्र यासाठी सर्वच शिक्षकांना आणि शिक्षण व्यवस्थेला दोष देण्यात अर्थ नाही. अनेक शिक्षकच या व्यवस्थेला नवा आयाम देत आहेत. नवे प्रयोग करत आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या नव्या वाटांशी अवगत करत आहेत.

सध्या करोनाशी दोन हात करताना नवे तंत्रज्ञान हाताळायचे धाडसही शिक्षकांनी दाखवले आहे. काहींनी या तंत्राचा अधिक योग्यपणे कसा वापर करता येईल, याची उदाहरणे घालून दिली आहे. समाजाला सक्षम करण्यासाठी शिक्षक हा वर्ग निश्चितच योगदान देत आहे, असा सूर यावेळी उमटला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *