Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदेशदूत संवाद कट्टा : देशदूतचा गेल्या 50 वर्षांचा प्रवास

देशदूत संवाद कट्टा : देशदूतचा गेल्या 50 वर्षांचा प्रवास

देशदूत संवाद कट्टा : देशदूतचा गेल्या 50 वर्षांचा प्रवास

सहभाग : ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, कवी रवींद्र मालुंजकर आणि तन्मय दीक्षित

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकच्या मातीतले दैनिक म्हणून आजही देशदूतचा लौकिक आहे. नि: स्पृह, निर्भिड पत्रकारितेचा शिरस्ता जोपासत नव्याची कास धरत ‘देशदूत’चा प्रवास गेली पाच दशके सुरु आहे. सुरुवातीला साप्ताहिक आणि नंतर दैनिक असा देशदूतचा प्रवास यशस्वी राहिला आहे.

देशदूतने अनेक पत्रकार तर घडवलेच शिवाय राज्यात घडलेल्या अनेक चळवळीत सहभाग घेऊन अनेक बदल घडविण्यात खारीचा वाटा देखील उचलला आहे. महापौर निवडणुकीत नव्या उमेदवाराला पाठींबा देत देशदूतच्या पुढाकाराने महापौर निवडणूक कशी उलटली होती याबाबत नाशिककरांना चांगलेच ठाऊक आहे.

अनेक राजकीय क्षेत्रातील आज बड्या नेत्यांना देशदूतने घडवले आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात देशदूतच्या कट्ट्यावर येऊन राजकारणाचे धडे घेत असायचे. अनेकदा प्रिंटींग थांबवून देशदूतने कर्तव्यनिष्टता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आजच्या कट्ट्यात दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत जाऊन राजकीय संपादक म्हणून नावलौकिक मिळवलेले ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, ज्येष्ठ वकील मिलिंद चिंधडे, माजी महापौर गुरमीत बग्गा आणि ज्येष्ठ कवी रवी मालुंजकर यांची उपस्थिती होती. या संपूर्ण कट्ट्यात मान्यवरांशी संवाद देशदूत आणि देशदूत टाईम्सच्या संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या