Exclusive Interview : गायक कलाकार राहुल देशपांडे यांच्यासोबत गप्पा
माझं घराणं हे माझ्यापासून सुरु होतं, हे आत्मविश्वासानं सांगणाऱ्या वसंतरावांची सांगितिक कारकीर्द यशोशिखरावर पोहोचली असली तरी त्यांचा तिथंवर पोहोचण्याचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. या संघर्षमयी प्रवासात त्यांना कायम साथ लाभली ती महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची म्हणजेच पु. ल. देशपांडे यांची. 'मी वसंतराव'च्या निमित्ताने त्यांच्या त्या काळात रंगलेल्या मैत्रीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
'मला आजोबांचा सहवास फारसा लाभला नाही. त्यामुळे कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून, त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांकडून मी आजोबांविषयीचे किस्से ऐकून आहे. त्यापैकीच एक म्हणजे आजोबा आणि भाईंची मैत्री. त्यांची मैत्री त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. त्यांचे अनेक किस्से मी ऐकले, जे चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतील. आजोबांच्या या सर्व प्रवासात भाईंनी त्यांना खूप मोलाची साथ दिली. जिथे फक्त अंधार दिसतोय तिथेच आशेचा किरणही आहे, याची जाणीवही भाईंनीच आजोबांना करून दिली. असे राहुल देशपांडे सांगतात....
देशदूतच्या विशेष संवादमध्ये कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी राहुल देशपांडे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी राहुल देशपांडे बोलत होते. लवकरच नाशकात ते वसंतोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम घेणार आहेत. यासोबतच नाशिक खूप चांगले स्वच्छ शहर असल्याचेही ते सांगतात.
पाहा संपूर्ण मुलाखत...