देशदूत संवाद कट्टा : 'या' आहेत द्राक्ष बागायितदारांच्या अपेक्षा

देशदूत संवाद कट्टा : 'या' आहेत द्राक्ष बागायितदारांच्या अपेक्षा

देशदूत संवाद कट्टा

विषय : करोना काळातील द्राक्षशेती

सहभाग : कैलास भोसले, उपाध्यक्ष, द्राक्ष बागायतदर संघ, महाराष्ट्र राज्य, अॅड रामनाथ शिंदे, द्राक्ष बागायतदार व योगेश रायते, माजी विभागीय संचालक, द्राक्ष बागायतदार संघ नाशिक

संवाद : डॉ वैशाली बालाजीवाले, कार्य. संपादक देशदूत आणि देशदूत टाईम्स नाशिक

Title Name

नाशिक । प्रतिनिधी Nashik

द्राक्षपंढरी म्हणून नाशिकचा असलेला लौकिक कायम टिकवून ठेवण्यासाठी द्राक्षांना किमान निश्चित दर Minimum fixed rates for grapes मिळालाच पाहिजे. तसेच नैसर्गिक संंकटांंपासून संरक्षणासाठी द्राक्षबागांना प्लास्टिक कव्हरचा पर्याय स्वीकारावा लागेल व त्यासाठी कव्हर क्रॉपची कास धरावी लागेल, असा सूर आज द्राक्ष बागायतदारांंच्या संवाद कट्ट्यात व्यक्त झाला.

‘देशदूत’ च्या विशेष संवाद कट्ट्यात आज द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय संचालक अ‍ॅड. रामनाथ शिंदे, प्रगतिशील द्राक्ष बागायतदार योगेश रायते आदी सहभागी झाले होते. ‘देशदूत’ च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांंनी त्यांंच्याशी संवाद साधला. या दिलखुलास संवादात त्यांनी द्राक्षांची सद्यस्थिती, करोना निर्बंंधासह बाजारभावाचे संकट यांचे सविस्तर विश्लेषण केले.

भोसले म्हणाले की, 16 चक्रीवादळाचे संकट घोघावत आहे. त्यातील 14 व्या चक्री वादळाच्या संकटाचा सामना सध्या सुरु आहे. त्यामुळे द्राक्ष बागायदार चिंतेत आहेत. सूर्य प्रकाश नाही. काही जिल्ह्यात गारपीट होत आहे. त्यामुळे शेतकरी पार धास्तावला आहे. फेब्रुवारी व एप्रिलमध्ये पुन्हा संंकटाचा अंदाज आहे. नैसर्गिक संकटामुळे सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे.

द्राक्ष उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंंत जाईपर्यतचा सखोल प्रवास शिंदे यांनी विषद केला. ते म्हणाले, लागवडीपासून ते विक्रीपर्यंंत प्रत्येक पावलावर लहान बाळासारखा सांभाळ करावा लागतो. संकटाशी सामना करत बाग वाढवाव्या लागतात. चांगली द्राक्ष आली तर भाव मिळेल की नाही ही चिंता असते. गेल्या 15 वर्षात जिल्ह्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट त्यानंतर नोटबंंदी व आता करोना यामुळे द्राक्षबागा टिकवायचे मोठेे आव्हान उभेे राहिले आहे. द्राक्षबागांंच्या जमिनी सुध्दा शेतकरी घेऊ शकत नाही त्यासाठी व्यापारीच पुढे येत आहेत, हे दुर्दैव आहे.

रायते यानी द्राक्षबागा पिकविणार्‍याचा एकूण खर्च व त्ंयांना मिळणारा भाव याचे गणित उलगडून दाखविले. हल्ली उत्पादन खर्च वाढत असल्याने एकरी तीन ते साडेचार लाखापर्यंंत खर्च जातो. मात्र तेवढा भाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीनंतर पंचनामे होतात. मात्र तीन लाखांच्या खर्चाला पाच हजाराची भरपाई दिली जाते. त्यामुळे काहीही साध्य होत नाही.

समारोप करतांना भोसले म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षातील अनुभव पाहता संंकटे पाठ सोडत नाही हे दिसून आले. म्हणूनच आमच्या बागायतदार संघाने आता जानेवारीच्या काळात 82 रुपये किलो, मार्चमध्ये 62 रुपये किलो एवढा तरी भाव मिळाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु केल ेआहेत. एकूण खर्चाच्या दहा टक्के नफा मिळाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.उत्पादन खर्चाचा वाढीव भार शेेवटी ग्राहकांनाच पेलावा लागणार आहे. त्याशिवाय द्राक्षबागा वाचणे व ग्रेपसीटी म्हणून नाशिकची ओळख टिकवणे शक्य होणार नाही. सध्या कर्जबाजारीपणामुळे सहकार संंस्थाकडून कर्ज मिळण्याचा मार्ग बंद आहे. सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे म्हणून त्यावर आता किमान हमी भाव व कव्हर क्रॉपकडे वळावे लागणार आहे, असे त्यांंंनी स्पष्ट केले.

निसर्गापुढे हतबल

कधी अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळ, यामुळे बागांचे नुकसान होते. निसर्गाने साथ दिली तर करोनाचे व टाळेबंदीचे संकट डोके वर काढते. त्यामुळे द्राक्ष दहा रुपये किलानेे विकायची वेळ येते. या सर्व विदारक परिस्थितीमुळेच द्राक्ष बागायतदार हवालदिल आहेत. त्यामुळे त्यांंना यंंदातरी चांगला भाव मिळावा. निंर्बंधातून द्राक्ष मुक्त ठेेवावीत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com