<p><strong>धुळे । Dhule</strong></p><p>आपले स्वत:चे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. ही मुलभूत गरजही आहे. मात्र प्लॉट किंवा घर घेतांना बर्याचदा त्यातील कायदेशीर बाबी आणि बारकावे बघितले जात नाहीत. त्यामुळे खरेदी करतांना झालेली चूक पुढे महागात पडते. यासाठी प्लॉट किंवा घर घेतांना काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असल्याचा सूर आजच्या चर्चेत उमटला.</p>