<p><strong>धुळे । Dhule</strong></p><p>काय वाचावे हे ज्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यासाठी इतरांनी आग्रह देखील धरु नये. मात्र वाचलेच पाहिजे यासाठी निश्चित आग्रह असला पाहिजे. खरे तर, एकट्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होते असे नाही, तर वाचकाला पुस्तकांपर्यंत आणवे लागेल आणि पुस्तकेही वाचकांपर्यंत पोहचवावी लागतील. पालकांनीही आपल्या पाल्यांना पुस्तके घेवून देण्याची स्वतः सवय लावण्याची गरज आहे, असा सूर चर्चेतून उमटला.</p>