देशदूत संवाद कट्टा : गच्चीवरची बाग

देशदूत संवाद कट्टा

गच्चीवरची बाग

सहभाग : संदीप चव्हाण व डॉ. स्मिता कापडणीस

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक देशदूत आणि देशदूत टाईम्स नाशिक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अंगणात, टेरेसवर, बाल्कनीत बाग फूलवण्यासाठी ( Terrace Garden )प्रत्येकाला उत्सूकता असते. मात्र त्यासाठी या झाडांची जिवन शैली व त्यांच्या देखरेखीचे ज्ञान घेतल्यास झाडे लावण्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो. या टेरेस गार्डनच्या माध्यमातून जैव विवीधतेची साखळी निर्माण करता येतेे. ही कडी जूळवण्यासाठी आपला पूढाकार व जबाबदारी मोठी असल्याचा सूर देशदूत संवाद कट्यातून उमटला.

‘गच्चीवरची बाग’ या विषयावर दै. देशदूततर्फे आयोजित संंवाद कट्यावर ऑरगनिक खत उत्पादक व टाकाऊ पासून टिकाऊ बनवणार्‍या दंतरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता कापडणीस व गच्चीवरील बाग तज्ज्ञ संदिप चव्हाण यांच्याशी दै.'देशदूत'च्या संंपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. प्रत्येकाला गच्चीवर बाग उभारण्याची घाई असते. त्यासाठी मोठा खर्च करतात. मात्र प्रत्यक्षात अशी बाग उभारताना आपण लावणार असलेल्या झाडांची माहीती घेणे, त्या झाडांची गरज लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्या झाडांना किती ऊन, किती पाणी गरजेचे असत, या सर्व बाबींचा विचार करणे गरजचे आहे. काही झाडे उन्हाअभावी खराब होतात, तर काही अति उन्हामुळे करपून जातात.याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्या झाडांची निगा कशी राखावी, याचे ज्ञान समजून घ्यावे. या झाडांसाठी काही वेळ मशागतीला देणे तितकेच गरजेचे आहे. काही झाडांच्या बाबतीत पाण्याचे गणित जुळवणे आवश्यक आहे. या झाडांना योग्य प्रमाणात पाणी,ऊन व सेंद्रिय खत दिल्यास परसातील बाग निश्चित आनंददायी ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

परसातली बाग फक्त फूलझाडांपर्यत मर्यादित राहीलेली नसून, यात भाजीपाला, फळफळावळे, पालेभाज्या देखिल उगवता येतात. त्यात प्रामुख्याने पपई, ऊस, द्राक्ष, लिंबू, मेथी, कांदापात, टोमॅटो, वांगे, गवती चहा, पालक या सारखे 40 ते 50 प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उगवता येऊ शकतात. यांना उगवण्यासाठी छोट्या कुंड्या,प्लॅस्टिक टब बोटल्स, कॅन, बादल्या यांचा वापर देखिल करता येतो.

या बागेच्या उभारणीपूर्वी प्रत्येकाने त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्या कुड्या ठेवण्याच्या जागेवर ऊन, वारा, पाऊस यांचे प्रमाण, झाडांची निवड करताना त्या जागेला साजेश्या झाडांचे प्रकार माहीत करुन घेणे तितकेच महत्वाचे आहे. झाडांच्या सवयीचा अभ्यास केल्यास किचन गार्डन, विंडो गार्डन, टेरेस गार्डन व परसातील बाग अश्या विविध प्रकाच्या बाग निर्माण करता येतील.

झाडांशी वाढवा कनेक्ट

यासोबतच झाडांची गूणधर्म तपासावीत, कोणत्याही झाडाला किड लागते तीची कारणे शोधावी.व उपाय योजना कराव्यात. त्यांचा अभ्यास ठेवणे अर्थात यासर्व प्रक्रियेत त्या मुक्या झाडासोबत आपला कनेक्ट वाढवणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

घरीच करा खत निर्मिती

सेंद्रिय खत घरातील टाकाऊ कचर्‍यापासून तयार करता येते. त्याला योग्य पध्दतीने हवा व पाण्याला शोषून घेणार्‍या पदार्थांचावापर केल्यास घरच्या घरी सेंद्रिय खत आपल्या स्वयंपाक घरातील कचर्‍यापासून तयार करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com