देशदूत संवाद कट्टा : जागतिक पर्यावरण दिनविशेष

जैव विविधता टिकवण्यासह वनराई विकास गरजेचा

देशदूत संवाद कट्टा : जागतिक पर्यावरण दिनविशेष

सहभाग : शेखर गायकवाड आणि अमित टिल्लू

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक, देशदूत आणि देशदूत टाईम्स

नाशिक । प्रतिनिधी

निसर्गाचे सहजीवन टिकवण्यासाठी आपल्याला महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. जैव विविधता टिकून राहण्यासोबतच वनराईचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. वनसंपदा नष्ट होत आहे. जमिनीचा पोत खराब होऊ लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपण येणार्‍या पिढीला कोणत्या प्रकारचे जीवन देणार आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचा सूर देशदूतच्या संवाद कट्ट्यातून उमटला.

मातीरक्षण व झाडांचे मातीशी नाते या पार्श्वभूमीवर आयोजित संवाद कट्ट्यावर मान्यवरांनी आपली मते मांडली. या चर्चेत प्रामुख्याने पर्यावरण मित्र म्हणून ओळख असलेले शेखर गायकवाड, जैवविविधता तज्ज्ञ अमित टिल्लू यांनी सहभाग घेतला होता. यांच्याशी देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधला. यावेळी मान्यवरांनी जैवविविधता झाडे जंगल यांच्या सहभागातून मातीचा कस कसा वाढू शकतो त्याचा कसा परिणाम मानवी जीवनासह वन्य जीवाष्मांवर होतो. यावर चर्चा करण्यात आली.

झाडे लावताना कोणत्या ठिकाणी कोणत्या झाडांची गरज आहे. याचे भान ठेवणे गरजेचे आहे. मातीची धूप थांबली पाहिजे होती. मात्र ती वाढते आहे. यावर लक्ष देण्याची गरज आहे. झाडांच्या मुळाशी सूक्ष्म जिवाणू निर्माण होतात. ते मातीला मदत करीत असतात. चुकीच्या झाडांमुळे ती प्रक्रिया होत नाही.

प्रत्यक्षात सूक्ष्म जीव हे पृथ्वीचा गाभा आहेत. सूक्ष्मजीव काढले तर आपण एक क्षणही जगू शकणार नाही. भूगर्भाचे चक्र आहेत. कर्म चक्र, नत चक्र,जल चक्र या माध्यमातून सूक्ष्म जिवांचे रक्षण व विकास होत असतो. मानवी हस्तक्षेपांमुळे त्याचा र्‍हास होत आहे. येथील परिसंस्था सबळ करण्याची गरज आहे. झाडांची पाने पडल्यानंतर ती कुजून त्यातून उर्जा निर्माण होते. त्या उर्जेतून नवनिर्मितीला चालना मिळत असते. या चक्राला हात लावू नये. मात्र आपल्या हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया नष्ट होऊ पहात आहे. हल्ली पानांचे विषटन प्रक्रियाच होत नसल्याने उर्जा निर्मितीचा र्‍हास होत आहे. अनेक डोंगरावर जैव परिसंस्था ढासळलेली होती.

पक्ष्यांंचा निवारा, किटकांचे अन्न सर्वच नष्ट होऊ पहात होते. निवडलेल्या नैसर्गिक झाडांमुळे काही अंशाने या इको सिस्टिमला पोषक वातावरण तयार करण्यात यश मिळत आहे. देवराईच्या जंगलात 220च्यावर वंश प्रजातीची झाडे लावलेली आहेत. पक्ष्यांचा अधिवास वाढला. या माध्यमातून ‘निसर्गाचे वाचनालय’ तयार करण्याचा प्रयन केला जात आहे.

अंजनेरीच्या जंगलात भारतातील एकमेव ‘सिरोपिनीया अंजनेरिका’हे झाड आढळते. पावसाळ्यात फुलते. परागी भवनासाठी देखील ठराविक जातीचे किटक याठिकाणी आढळतात. भारतात 50 प्रकारच्या माश्या परागीभवन करतात. औषध फवारणीतून त्या मरतात. एक जैव विविधतेवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे एकसुरी एककल्ली काहीच होऊ नये. शेवटी सहजीवन हाच पर्याय महत्त्वाचा असल्याचा सूर मान्यवराच्या चर्चेतून व्यक्त झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com