देशदूत संवाद कट्टा : माती वाचवा : बोरगड येथील मानवनिर्मित जंगल

‘देशदूत’ विशेेष संवाद कट्ट्यात वन्यजीव अधिकारी काळे व नेचर कॉन्झर्वेशनच्या कोठुळे यांच्याशी चर्चा

देशदूत संवाद कट्टा

माती वाचवा : बोरगड येथील मानवनिर्मित जंगल

सहभाग : अशोक काळे, वनविभाग नाशिक, पूजा कोठूळे फिल्ड ऑफिसर, एनसीएस नाशिक

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, कार्यकारी संपादक देशदूत आणि देशदूत टाईम्स नाशिक

Title Name

शेतातील मातीबरोबरच ( Soil ) जैवविविधता टिकवायची असेल तर अवतीभोवतीचे डोंगर व जंगलेही वाचवले पाहिजे.वणव्यांपासून जंंगलाचे रक्षण केलेे पाहिजे.तरच जमिनीची सुपीकता टिकवता येऊ शकते. त्यासाठी वनखात्याबरोबरच पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही तेवढेच संवेदनशीलपणे यात सहभागी झाले पाहिजे, अशी अपेक्षा वन्यजीव अधिकारी अशोक काळे (Wildlife Officer Ashok Kale)व नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या क्षेत्रीय अधिकारी पूजा कोठुळे (Pooja Kothule, Regional Officer, Nature Conservation Society)यांनी व्यक्त केली.

Title Name

‘देशदूत’च्या ( Deshdoot )विशेेष संवाद कट्ट्यात आज काळे व कोठुळे यांच्याशी ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी माती वाचवा - बोरगड येथील मानवनिर्मीत जंगल.या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

काळे म्हणाले येथे जंगल,नद्या,डोंगर यांंची अपुल संपत्ती लाभली आहे. मात्र गेल्या 20 वर्षात शेतीचे स्वरुप बदलले आहे.पाऊस अनियमीत पडत आहे.मानवी वस्तीे जंगलात अतिक्रमण करत आहे. त्यामुळे जंगल कमी होत आहे.डोेंगरावर केवळ झाडे झुडपे दिसत आहेत.खडक उघडे पडून पावसाळ्यात चांगली काळी मातीही वाहून जात आहे.त्यामुळे जंगलाचा होणारा र्‍हास थांंबविणेे गरजेचे झाले आहे.

त्यानंंतर बोरगड येथील डाेंंगरावर लागलेल्या आगी व त्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर लावलेल्या झाडाझुडपांबद्दल कोठुळे म्हणाल्या की, बोरगडला पूर्वी सागाची भरपूर झाडे होती.नंतर तोड होऊ लागली.काही वेळा वनवे लागले. त्यामुळे डेांगर ओसाड पडू लागला ेहोता. 2007 मध्ये महिंद्रा ऍण्ड महिंंद्रा कंपनीच्या सहकार्याने येथे दिड लाख झाडे लावली.बोरगड परीसरातील नागरिकांंनी खूप चांगले सहकार्य केले. लष्कराच्या तळामुळे येथील ंजंगलाचे बर्‍यापैकी रक्षण झाले.त्यामुळे आता सर्वाधिक झाडे येथे दिसत आहेत.बोरगड डोंगराला गतवैभव प्राप्त करुन देण्यात चांगले यश मिळाले आहे.त्यामुळ ेजमिनीची धूप थांबून सुपीक जमीन टिकुन राहिली आहे.

डोंगराला लागणारे वणवे, त्यानंतर वन्यजीवांचें शहरात होणारे आगमन व त्यामुळे नागरिकांत निर्माण होणार्‍या भितीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,वणवे हे एक प्रकारची आपत्तीच आहे. बहुतांशी वेळा वणवे हे मानव निर्मीतच असतात.मात्र आग लावणारे ेशोधणे अवघड असते. वनवा लागल्यानंतर यंत्रणा येईपर्यंंत स्थानीक नागरिकांनी ती आग विझवीण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते.

शेतकर्‍यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.यासाठी 1926 हा हेल्पलाईन नंबरही देण्यात आला आहे.वनवा लागल्यानंतर तो विझवीला गेला तरी त्यामुळे झालेलेे नुकसान कदापी भरुन निघत नाही.यात झाडे तर जळतातच मात्र मातीची सुध्दा हानी होते. आगीच्या घटनेंनंतर वनखात्याने काही ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत.मात्र तरी सुध्दा स्थानिक नागरिकांंनी याबाबत दक्ष राहणेे गरजेचे आहे.

वन्यजीवांचे शहरात होणारे आगमन,त्यामुळे होणारी जिवीत हानी या बाबत ते म्हणाले की, वन्यजीव कधीही नरभक्षक नसतो. वनात जेव्हा त्याला पाणी व भक्ष मिळत नाही. तेव्हाच तो भक्षाच्या शोधात नागरी वस्तीत येतो. त्यावेळी नागरिकांनी गर्दी न करता वन खात्याला त्यांंंचे काम करु दिले पाहिजे. मात्र उत्सुकतेपोटी सर्वच तेथे गर्दी करतात. दुर्घटना घडतात.त्यासाठी वन व वन्यजीव कायदा माहिती होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com