देशदूत संवाद कट्टा : वसुंधरा दिन विशेष

देशदूत आणि मविप्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने श्री सद्गुरू यांच्या कार्यक्रमाची घोषणा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पृथ्वीकडे ( Earth )पाहताना हवा,पाणी,नदी यांच्या सोबतच मातीचा ( Soil )विचार होणे गरजेचे आहे. शहरीकरणामुळे माती दिसेनाशी झाली आहे.तर बर्‍याच ठिकाणी जादा उत्पन्नाच्या नादात जमिनची गुणवत्ता ढासळलेली आहे.वसुंधरेची चिंता प्रत्येकाला आहे. प्रत्यक्षात शेती, माती यावर काम करण्याची गरज (Actually the need to work on agriculture, soil )आहे.

मातीला आपण आई मानतो. या काळ्या मातीच्या संवर्धनासाठी संयुक्तिक प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य असल्याचा सूर देशदूत संवाद कट्ट्यात उमटला.

वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर 'देशदूत' तर्फे आयोजित संवाद कट्यात पर्यावरण प्रेमी डॉ. कल्पना संकलेचा, चंद्रकिशोर पाटील, निशिकांत पगारे,योगेश बर्वे, मनीष बाविस्कर, रोशन केदार यांनी सहभाग घेतला होता.

यासंवाद कट्ट्यात देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चर्चेत 40 वर्षांपूर्वी नाशिकचा थंड हवेचे ठिकाण म्हणून लौकिक होता. गेल्या काही वर्षात वाढणारे तापमान हे चिंतेचा विषय झालेला आहे. याला कारण ही वाढणारे सिमेंटचे जंगल आहे. हवेच्या प्रदूषणासोबतच मातीतील बदल हे रासायनिक खतांमुळे झालेले असल्याचे डॉ. कल्पना संकलेचा यांनी सांगितले.

जनप्रबोधनातून नदी पात्रात कचरा टाकणार्‍यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. ते थांबले पाहीजे. काही अंशाने आता कूठे नदीच्या किनार्‍याला माती दिसू लागली असल्याचे चंदू पाटील यांनी सांगितले. लहानपणी बालके मात खात होते. आज मातीच दिसत नसल्याने त्यावर जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. गोदावरीबद्दल जागरुकता आणण्यातून नदीत होणारे प्रदूषण काही प्रमाणत कमी झाल्याचे दिसून येत असल्याने जनसामान्यांमध्ये जागरुकता येत आहे ही समाधानाची बाब असल्याचे निशिकांत पगारे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.