सहभाग : डॉ. रुचा सुळे, सुनील ठाकूर आणि मिलिंद वैद्य

संवाद : डॉ. वैशाली बालाजीवाले, संपादक देशदूत आणि देशदूत टाईम्स

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच बंदिस्त आहेत. यामुळे महत्वाचे आव्हान हे वयस्करांची काळजी घेणे हेच आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा संवाद कट्टा. गेल्या सहा महिन्यांपासून देशावर करोना विषाणूने थैमान घातले आहे.

अशा परिस्थितीत घरातील ज्येष्ठ व्यक्तींना दररोज घराबाहेर निघण्याची सवय, मंदिर, गार्डनमध्ये जाणारे अनेक वयस्कर मंडळी अचानक या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरामध्ये आहेत. त्यामुळे घरात चिडचिड होणे, मानसिक ताण अशा घटना वाढल्याचे दिसून येते.

अनेकजण घरून काम करत आहेत तर अनेकजन हे कार्यालयात जाऊन किंवा फिल्डवर जाऊन काम करत आहेत. न दिसणारा हा विषाणू रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या नागरिकांचा बाधा पोहोचवतो. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळीपासून आपण बाहेरून आल्यानंतर दूर राहायला पाहिजे.

टीव्ही तसेच वर्तमानपत्रातील दररोज आलेल्या बातम्या यामुळे अनेकदा ताण येतो अशा वेळी त्यांच्या मनातून काढत. वयस्कर व्यक्तींची आवड निवड लक्षात घेऊन त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.