देशदूत सिटी टाॅक : प्रदूषण करणार नाही, करू देणार नाही - विद्यार्थ्याची शपथ

नाशिक | Nashik

नदी प्रदुषण करणार नाही. पाणी वाया घालविणार नाही. प्लॅस्टीक मुक्तीचा प्रयत्न करु असा निर्धार आज स्वामी विेवेकानंद स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते दैनिक देशदूतच्या 'सीटी टॉक' कार्यक्रमाचे. (Deshdoot City Talk) गेल्या दोन वर्षाच्या कोरोना लॉकडाऊन नंतरचा हा पहीला कार्यक्रम आज देशदूतच्या प्रांगणात उत्साहात झाला... (godavari river pollution)

नदीच्या अभ्यासक डॉ. शिल्पा डहाके (Dr Shilpa Dahake) व गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष राजेश पंडीत (Rajesh Pandit) यांनी 9 वी च्या विद्यार्थ्यांना नाशिकची जिवन वाहीनी गोदावरीची ओळख करुन दिली. डॉ. डहाके याप्रसंगी म्हणाल्या, नाशिकची गोदावरी आपल्या सर्वांच्या परीचयाची आहे. तिचे पुर आपण नेहमी पाहतो, तसेच तिच्यावर तरंगणारे हिरवे शेवाळ, व घाणीचे साम्राज्यही कायम दिसते.

तरंगणारेे शेवाळ हे नदीत मिसळणार्‍या प्रदूषित केमीकल रहीत पाण्याचे द्योतक असते. या नदीत दुषीत पाणी सोडले जाऊ नये म्हणुन दोन मल्लनिःस्सारण केंद्र उभारले आहेत. मात्र, शहराची व्याप्ती वाढत असल्याने आता तेही अपुरे पडत आहेत. अधिक मलनिःस्सारण केंंद्रांची गरज भासु लागली आहे. नदीमुळे नाशिकचे महत्व अधोरेखीत होते. तिच्या पाण्यावर आपले जीवन समृध्द होत आहे. हा गोदावरीचा वारसा आपणच टिकवुन ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन तिला निर्मळ ठेवणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

त्यानंतर राजेश पंडीत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी गादेावरी निर्मळ राहण्यासाठी कायदेशीर सुरु असलेल्या लढ्याची माहीती दिली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्लॅस्टीक वापरणार नाही. घरातही कोणाला वापरु देणार नाही. नदीचे प्रदुषण करणार्‍यांना रोखु, किमान एकतरी झाड लावु. असा संंकल्प करण्याचा संदेश दिला.

त्यांंच्या आवाहनाला उपस्थित विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दैनिक देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ, वैशाली बालाजीवाले यांंनी प्रास्ताविक केले. गोदावरीची माहीती विषद केली. तसेच वृत्तसंपादक एन.व्ही. निकाळे यांनी आभार मानले. यावेळी ज्ञानेश मगर, ऐश्वर्या कुटे,संतोष उदार आदी शिक्षक वृंद् उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com