पुस्तक संस्कार जोपासायला हवा !

सार्वमत संवाद कट्टा : जागतिक पुस्तक दिन

अहमदनगर (प्रतिनिधी)-

मानवाच्या जाणीवा प्रगल्भ करण्यात पुस्तक संस्काराचा मोठा वाटा राहिला आहे. अलिकडे वाचन संस्कृतीची घसरण आणि त्याचवेळी उथळ समाज व्यवस्थेने खाल्लेली उचल दिसून येते. तरूण पिढीने पुस्तक व वाचन संस्कार जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे, असे आवाहन विचारवंत, लेखक हेरंब कुलकर्णी (अकोले) व लेखक नरेंद्र लांजेवार (बुलढाणा) यांनी केले.

‘सार्वमत संवाद कट्टा’ या उपक्रमात जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘पुस्तक आणि वाचन संस्कृती’ या विषयावर दोघा मान्यवर साहित्यिकांशी शिक्षण अभ्यासक तथा लेखक संदीप वाकचौरे यांनी संवाद साधला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com