Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

सॅमसंगकडून ‘सॅरो’ स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत साडेअकरा लाख

Share

मुंबई | प्रतिनिधी

सॅमसंगने मोबाईलमध्ये क्रांती केल्यानंतर नुकताच एक स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही नेहमीच्या टीव्हीसारखा आयताकृती नाही तर उभ्या आयताकृती म्हणजेच  व्हर्टीकल आकारात आहे. या टीव्हीचे नाव ‘सॅरो’ ठेवण्यात आले असून यात मोबाईलसारखी माहिती बघणे शक्य होणार आहे.

या टीव्हीत गेम खेळता येतील. मोबाईलसारखा फील युजर्सला होईल.  सॅमसंगने या टीव्हीमध्ये ४३ इंचाची स्क्रिन दिली असून हॉरिझोंटल करुनही ग्राहक हा टीव्ही बघू शकणार आहेत.

सॅमसंगच्या या अनोख्या टीव्हीची किंमत १२ हजार ५०० पाउंड म्हणजेच भारतीय रुपयांत हा टीव्ही ११ लाख ३० हजार रुपयांना ग्राहकाला उपलब्ध होणार आहे.

अंदाजे पुढील महिन्यात दक्षिण कोरियात हा टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध होईल. इतर देशांमध्ये हा टीव्ही कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल याबाबत कंपनीने गुप्तता पाळली आहे.

हे आहेत वैशिष्ट्ये

  • ४.१ चॅनल
  • ६० वॉटचा हायएंड स्पीकर
  • यामुळे सॅमसंग म्युझिकसह स्मार्टफोनवर सेव्ह केलेली गाणीदेखील ऐकू शकतो.
  • सॅमसंग व्हर्चुअल असिस्टंट Bixby ने नियंत्रित केले जाऊ शकते.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!