‘सॅमसंग गॅलेक्सी नोट 9’ भारतात लॉन्च

0

नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने विकसित मोबाईल लॉन्च करण्यात येत आहे. यामुळे मोबाईल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरु झालेली पाहावयास मिळते आहे. मोबाईल क्षेत्रामध्ये व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले नाव म्हणजे सॅमसंग. अनेक दिवसांपासून ग्राहकांना प्रतिक्षा लागलेला Samsung Galaxy Note 9 हा स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च करण्यात आला आहे. 24 ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरू होत आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

किंमतीबाबत जाणून घ्या ….
सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किमत 67 हजार 900 रुपये असणार आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 84 हजार 900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यासोबतच कंपनीने नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. सॅमसंगच्या शॉपमध्ये या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. एचडीएफसी बॅंकेकडून या फोनवर 6000 रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर देण्यात येणार आहे.

स्पेसिफिकेशन –
मोबाईलला 6.4 इंच क्वाड एचडी+ सुपर अॅमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.फोन वजनास केवळ 200 ग्रॅम इतकं आहे. Galaxy Note 9 मध्ये स्नॅपड्रॅगन एक्सीनॉस 9810 प्रोसेसर (2.7GHz + 1.7GHz) व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा ऑटोफोकस कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आला आहे.

S Pen ब्ल्यूटुथ –                                                                                                               या स्मार्टफोनसह मिळणाऱ्या S Pen ब्ल्यूटुथमध्येही काही नवे फिचर्स देण्यात आले आहेत. याचा वापर रिमोट कंट्रोलप्रमाणेही करता येणार आहे. फोटो काढण्यासाठी S Pen चा वापर करता येईल. एकदा बटन दाबल्यानंतर कॅमेरा सुरू होईल, बटन दोन वेळेस दाबल्यानंतर फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्यामध्ये हवं तसं स्विच करता येईल.

 

LEAVE A REPLY

*