Samsung Galaxy Note 9 कोणत्या दिवशी भारतात लॉन्च होणार जाणून घ्या?

0
मुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या सॅमसंग कंपनी आपला आणखी एक बजेट फोन बाजारात घेऊन येतोय. सॅमसंगचा प्लॅगशिप गॅलक्सी नोट ९ भारतामध्ये २२ ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. सॅमसंगने गॅलेक्सी ऑन ८ हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला होता. Samsung Galaxy Note 9 हा फोन सॅमसंग गॅलक्सी ऑनचे अपग्रेडेड व्हेरियंट आहे. पहिल्यापेक्षा आधिक चांगला असल्याचा दावा सॅमसंगने केला आहे. सध्या Samsung Galaxy Note 9 ची प्री बुकिंग सुरु आहे.

गॅलेक्सी नोट ९ हा फोन ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी आणि ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये मायक्रो एसडी कार्डची सुविधा असून एक्स्पांडेबल मेमरी ५१२ जीबीपर्यंतची असेल. ६ जीबी रॅम व १२८ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६७ हजार रुपये तर ८ जीबी रॅम व ५१२ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ८४ हजार ९०० रुपये इतकी असेल. ग्राहक ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने फोन बुक करू शकतात. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सैमसंग मोबाइल स्टोरवर जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकता.

फोन फीचर्स
स्क्रीन – ६.४ इंच
स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर
बॅटरी – ४००० एमएएच
कॅमेरा – ड्युएल रिअर कॅमेरा १२ मेगापिक्स, फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल
सिम – ड्यूअल सिम

LEAVE A REPLY

*