समृद्धी महामार्ग : २६ गावातील दरांच्या याद्या सोसायटी फलकावर

0

डुबेरे (वार्ताहर) : समृद्धी महामार्गात बाधीत होणाऱ्या सिन्नर तालुक्यातील 26 गावांना देण्यात येणाऱ्या दरांच्या याद्या आज (दि.11) गावातील सोसायटीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.

डुबेरे, जयप्रकाशनगर, सोनारी, सोणांबे, कोनांबे, शिवडे, घोरवड, सावतामाळीनगर, पांढुर्ली, बोरखिंड, आगासखिंड, बेलु, पाथरे खु., वारेगाव, सायाळे, मलढोण, दुसंगवाडी, वावी, फुलेनगर, मऱ्हळ खु., मऱ्हळ बु., धोंडविरनगर, खंबाळे, दातली आदी गावांना सन 2017-18 च्या रेडीरेकनरचे हेक्टरी दरा प्रमाणे जिरायती व हंगामी बागायतीसाठी भूसंपादन कायद्यानुसार 4 पट मोबदला तर खाजगी वाटाघाटीने 5 पट मोबदला देणार असल्याचे दर प्रसिद्ध केले आहे.

फलकावर प्रसिद्ध झालेल्या याद्या बघण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. दर वाचून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे.

आम्हाला या मार्गासाठी जमिनीच दयायच्या नाही. मात्र सरकार बळजबरी का करतंय. शेतकरी पहिल्यापासून या मार्गाला प्रखर विरोध करत असून देखील मनमानी करून जमिनी घेण्याचा प्रयत्न सरकारने चालवला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

LEAVE A REPLY

*