थेट खरेदीतून शेतकर्‍यांना 200 कोटींचा मोबदला; नाशिक जिल्हयात 186 हे. संपादित

0
नाशिक । मुंबई नागपुर समृध्दी महामार्गासाठी नाशिक जिल्हयात थेट खेरदीव्दारे 186 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यापोटी 200 कोटी रूपयांचा मोबदला शेतकर्‍यांना देण्यात आला. 16 नोव्हेंबर रोजी मुंबई मुख्यमंत्रयांच्या अध्यक्षतेत होणार्‍या समृध्दी महामार्गाच्या आढावा बैठकिच्या पार्श्वभुमीवर आज उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हयातील भुसंपादनाचा आढावा घेण्यात आला.

नाशिक जिल्हयातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून जाणार्‍या या महामार्गासाठी आतापर्यंत सुमारे 186.29 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यापोटी सुमारे 215.29 कोटी रूपयांचा मोबदलाही शेतकर्‍यांना देण्यात आला आहे. जिल्हयातून या महामार्गाला विरोध कायम असून काही शेतकर्यांनी थेट या महामार्गाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मात्र काही लोकांच्या विरोधामुळे लाकोपयोगी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत थांबवता येणार नाही अशी भुमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली. राज्यातील 30 तालुके आणि 355 गावांतून जाणारा हा महामार्ग देशातील राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे.

राज्यातील 24 जिल्ह्यांचे अर्थकारण बदलणारा हा महाराष्ट्र राज्याला सक्षम करणारा असा नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन-वे असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा चौफेर विकास साधला जाणार आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे सर्वात प्रगतीशील राज्य बनणार आहे. विकासाचा दर अन्य राज्यापेक्षा कित्येक पटीने वाढणार असून 25 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची भुमिका सरकारने मांडली आहे.

शासनाच्या या भुमिकेमुळे शेतकर्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असुन समृध्दी महामार्ग हा त्यापैकीच एक आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारया बैठकित या महामार्गाबाबत जिल्हयाचा प्रगती आलेख उंचावा याकरीता आता अधिकारी भुसंपादनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. दरम्यान यासंदर्भात आज झालेल्या बैठकित गावनिहाय संपादनाची स्थिती जाणून घेण्यात आली.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक संपादन : आतापर्यंत जिल्हयात 440 शेतकर्‍यांकडून थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादित करण्यात आली आहे. यात सिन्नर तालुक्यातील 293 व इगतपुरी तालुक्यातील 440 शेतकर्‍यांचा सामावेश आहे.

तसेच सिन्नर तालुक्यात 132.96 हेक्टर तर इगतपुरी तालुक्यातून 53.33 हेक्टर अशा एकूण 186.29 हेक्टर जमीनीचे संपादन करण्यात आले असून 215.29 कोटींचा मोबदला शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. जमीन संपादनात सिन्नर तालुका आघाडीवर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*