Type to search

समृद्धीसाठी जमिनीचा सक्तीने ताबा

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

समृद्धीसाठी जमिनीचा सक्तीने ताबा

Share

सिन्नर | अजित देसाई

समृद्धी महामार्गासाठी तालुक्यात 90 टक्के जमिनीचे थेट खरेदीने संपादन करण्यात आले असले तरी विरोध असलेल्या10 टक्के जमिनी संपादित करणे शिल्लक आहेत.

या जमिनी भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने ताब्यात घेऊन रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

अडचणी असलेल्या जमिनी खरेदी करता न आल्याने त्यांचा ताबा भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार घेण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके कार्यरत करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात या जमिनीचा ताबा घेण्यासह महामार्ग बांधकामासाठी असणारे शेतकऱ्यांचे अडथळे दूर करण्यात येत आहेत.

या कामाला विरोध करून जमिनी द्यायला नकार देणाऱ्यांना प्रारंभी समजून सांगण्यात येत असून पुढच्या टप्प्यात सरकारी कामात अडथळे आणल्याप्रकरणी प्रसंगी गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!