Type to search

Featured सार्वमत

समृद्धी महामार्गाखालून निळवंडेच्या उपवितरिका करा

Share

जलसंपदाची रस्ते महामंडळाकडे मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – निळवंडे कालव्यांच्या उपवितरिका समृद्धी महामार्गाचे काम होण्याच्या आधीच पूर्ण करण्याची निळवंडे कालवा कृती समितीची मागणी जलसंपदा विभागाने मान्य केली असून तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे नाशिक येथील कार्यालयाला दिले आहे. त्या बद्दल सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. समृध्दी महामार्ग निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातून सिन्नर तालुक्यातून सायाळे, मलढोण, पाथरे, दुशिंगपूर आदी गावांतून जात आहे. मात्र या प्रकल्पाच्या टेलकडील प्रस्तावित वितरिका व उपवितरीका अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. समृद्धी महामार्गाच्या कामाच्या आधी या वितरिका पूर्ण होणे गरजेचे आहे. या कडे निळवंडे कालवा कृती समितीने 31 मे रोजी घुलेवाडी संगमनेर येथील जलसंपदा विभागाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधून घेतले होते व या वितरिका, उपवितारीका तात्काळ या महामार्गाच्या कामाआधी पूर्ण करण्याची मागणी केली होती. ती अप्पर प्रवरा-2 विभागाने मान्य केली असून या बाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई यांचे नाशिक येथील शिबिर कार्यालयाकडे नुकताच पत्रव्यवहार केला आहे.

या भागासाठी निळवंडे डाव्या कालव्याच्या तळेगाव शाखेच्या वितरिका महामार्गाला छेदून जात असून वितरिका ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गास छेदतात त्या ठिकाणी योग्य त्या आकाराचे क्रॉसिंग दोन बाय दोन मीटर करणे आवश्यक आहे. सदर कालव्यांची कामे सीबीएल प्रमाणे होणार असून कालवा तळ पातळी राखण्यात यावी व बांधकामास अर्धा मीटरची सिल्ट पॉकेट ठेवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी संगमनेर येथील ऊर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ. बा. कवडे यांची सही आहे. दरम्यान कालवा विभागाने सिन्नर तालुक्यातील वितरिकांच्या कामाची दखल घेतल्याने निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, गंगाधर रहाणे, तानाजी शिंदे, ज्ञानदेव शिंदे गुरुजी, सुधाकर शिंदे, भास्कर शिंदे, विजय शिंदे, श्री. ढमाले आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!