आंदोलकांच्या मनधरणीसाठी प्रशासनाची धावाधाव

0

नाशिक । दि. 12 प्रतिनिधी
समृध्दी महामार्गाला होणारा विरोध , कर्जमुक्तीसाठी सुकाणु समितीने पुकारलेले आंदोलन आणि कश्यपी प्रकल्पग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी घेण्याचा दिलेला इशारा यामुळे स्वातंत्र्दिनाच्या कार्यक्रमावर आंदोलनाचे सावट आहे. मात्र आंदोलकांची मनधनरणीसाठी पोलीस आणि प्रशासकिय यंत्रणेची धावाधाव सुरू आहे.

कश्यपी धरणात जमीनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घेण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने दिलेले आश्वासनाची पुर्तता न केल्याने गेल्यावर्षी कश्यपी धरणग्रस्तांनी धरणात उडया घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यावेळी प्रशसनाने प्रकल्पग्रस्तांची समजुत काढत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागु शकला नाही. आता पुन्हा एकदा या धरणग्रस्तांनी स्वातंत्र्यदिनी धरणात उड्या मारुन या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा इशारा दिला आहे. समृध्दी महामार्गात जमीनी द्यायच्या नाहीत.

म्हणून इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील 56 गावातील शेतकरी नाराज असून दोन्ही तालुक्यात वातावरण पेटलेले आहे. समृध्दी आणि कश्यपी या दोन विषयांवरुन बाधीत शेतकऱी भूसंपादन व त्याचा मोबदला या विषयावर आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

झेंडावंदन करू न देण्याचा इशारा
शेतकरी कजर्माफीसह शेतक़र्‍यांच्या विविध विषयावर शेतक़र्‍यांची सुकाणू समिती नाराज आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्हे तर सामान्य शेतक़र्‍याच्या हस्ते ध्वजंवंदन करण्यासह शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुकाणू समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडविण्याचा इशारा दिला आहे. स्वातंत्रदिनाच्या दिवशी नाराज शेतकऱयांनी कुठले आंदोलन करु नये यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

चर्चेतुन मार्ग काढण्याचा प्रयत्न
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीचे आंदोलन टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. कश्यपीच्या प्रश्नी मुंबईत सोमवारी (ता.14) बैठक घेउन त्यात तोडगा काढण्यासाठी धावाधाव सुरु आहे. कश्यपीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी महापालिका आयुक्त राज्य शासनाला प्रस्ताव देणार आहेत. तर जागेच्या मोबदल्याबाबत जिल्हा यत्रणा मध्यस्थी करणार आहे. समृध्दी आणि शेतकरी सुकाणूने आंदोलन करु नये म्हणून पोलिस व महसूल यंत्रणा नेत्यांशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

*