Video : आम्ही मरू नाहीतर त्यांना मारू; समृद्धीबाधितांचा तहसीलवर मोर्चा

0
सिन्नर | समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढून विरोध दर्शवला. हा मार्ग करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारू नाहीतर आम्हीतरी मरू अशा शब्दांत येथील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाला विरोध दर्शिवला आहे.

मुंबई येथे होणाऱ्या मराठा मोर्चामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आज (दि.10) दहा जिल्ह्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा कडून समृद्धी रद्दसाठी साकडे घालण्यात आले.

सिन्नर तालुक्यातील शिवडे, सोनाबे, डुबेरे, पाथरे यासह अन्य गावातील शेतकऱ्यांनी तहसील वर मोर्चा काढला. सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला रोष प्रकट केला.

मोजणीसाठी गावात येणाऱ्या अधिकाऱ्यांना मारू नाहीतर आम्ही मरू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. संघर्ष समितीचे राज्य समन्वयक राजू देसले, सोनाथ वाघ, शांताराम ढोकाने, अंबादास वाजे, आशा पवार, नीता पवार, निशिगंधा पवार यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले. पोलिसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

*