समृद्ध जीवन गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा

0
नाशिक | समृद्ध जीवन गुंतवणूकदार बचाव समितीने आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी समृद्ध जीवनची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली.  महिलांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूकमोर्चात सहभाग घेतला.

समृद्ध जीवनचे जिल्ह्यात जवळपास २०० कोटींचे गुंतवणूकदार आहेत. समृद्ध जीवनची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

*