Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

समग्र शिक्षा अंतर्गत 3624 शाळांना सात कोटी 30 लाख रुपये अनुदान

Share
सभापतिपदी शेटे, परहर, गडाख, दाते यांची निवड, Latest News Speaker Shete Parhar Gadakh Date Selected Ahmednagar

संगमनेर (वार्ताहर)- अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या 3624 शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत अनुदानासाठी सात कोटी 30 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. या संदर्भातील आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आहेत.

या वर्षापासून शाळा अनुदानाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, यापूर्वी शाळा हा घटक धरून अनुदान दिले जात होते. मात्र या वर्षापासून विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेऊन शाळेचे अनुदान मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शाळांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सदरचे शाळा अनुदान हे शासकीय आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा, समाजकल्याण विभागाच्या शाळा, विद्यानिकेतन, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, कटक मंडळे इत्यादींसाठी मंजूर करण्यात आले आहे. भारत सरकारच्या अनुदानाच्या निकषात झालेल्या बदलानुसार शाळेचा पट तीस पर्यंत असल्यास त्यांना प्रति शाळा पाच हजार रुपये. साठ पर्यंत पटसंख्या असणार्‍या शाळांना दहा हजार रुपये.शभर पट असणार्‍या शाळांना .25000 हजार. 250 पट असणार्‍या शाळांना 50000 तर एक हजारापर्यंत पट असणार्‍या सर्वांना 75 हजार रुपये . एक हजारपेक्षा अधिक पट असणार्‍या शाळांना एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 1507 शाळा या तीस पटाच्या आतील आहेत. त्या शाळांना 75 लाख 35 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. 60 पर्यंत पट असणार्‍या 887 शाळा असून त्यांना 87 लाख 70 हजार रुपये अनुदान वितरण केले जाणार आहेत. शंभर पर्यंत पट असलेल्या शाळांची संख्या 467 इतकी असून त्या शाळांना एक कोटी 16 लाख 75 हजार रुपये अनुदान वितरण होणार आहे. दोनशे पन्नास पर्यंत पट असणार्‍या शाळा 677 इतके असून त्यांना तीन कोटी 38 लाख 50 हजार रुपये वितरण केले जाणार आहे. एक हजारापर्यंत पट असणार्‍या शाळांची संख्या 96 इतके असून त्या शाळांना 72 लाख रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक पट असणार्‍या एकही शाळा अस्तित्वात नाही. जिल्ह्यातील 3624 शाळांना सहा कोटी 90 लाख 30 हजार रुपये अनुदान वितरण केले जाणार आहेत.

सदरचे अनुदान हे शाळेतील नादुरुस्त पंखे, लाईट, खिडक्या खेळाचे मैदान तसेच इतर आवर्ती खर्चासाठी करावयाचे आहेत खेळाचे साहित्य दोस्ती विज्ञान प्रयोगशाळा साहित्य खरेदी शाळेचे विज बिल इंटरनेट पाण्याची सुविधा वार्षिक देखभाल शाळा इमारत दुरुस्ती शौचालय दुरुस्ती भौतिक सुविधा सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सदरच्या अनुदानाचा उपयोग करावयाचा आहेत स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय याकामी स्वच्छता व सुविधा शौचालयात पाण्याची उपलब्धता यासाठी एकूण तिच्या दहा टक्के निधी या उपक्रमांवर खर्च करता येणार आहेत त्याचबरोबर हे उपक्रम राबवत असताना समाजाचा सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहेत सदाचार नीति हात सन 2019 20 या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला असल्याने त्याचा वर्षांमध्ये खर्च होईल याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेत.सदरचा निधी तालुका निहाय गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे पाठवण्यात आला असून त्यांनी आठ दिवसाच्या आत शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावरती रक्कम जमा करावयाची आहे.

संगमनेर तालुक्यास सर्वाधिक निधी
अहमदनगर जिल्ह्यात असणार्‍या एकूण चौदा तालुक्यांपैकी सर्वाधिक निधी संगमनेर तालुक्याला प्राप्त झाला आहे. या तालुक्यात 353 शाळा असून 73 लाख पंचवीस हजार रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे. तर सर्वात कमी निधी जामखेड तालुक्याला मिळणार असून तेथे 178 शाळा असून 31 लाख 45 हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. पन्नास लाखांपेक्षा अधिक निधी अकोले, नेवासा,श्रीगोंदा व राहुरी तालुक्याला मिळालेला आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!