Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसलमान, सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

सलमान, सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

मुंबई | Mumbai

पंजाबी गायक सिध्दू मूसेवाला (Punjabi Singer Sidhu Musewala) याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या (Murder by shooting) करण्यात आली.

- Advertisement -

त्यानंतर आता अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकी (Threat) देणारं पत्र मिळालं आहे. त्या पत्रात सलमानला ‘मुसेवाला सारखे करू’ असे लिहिले होते.

सलमान खानचे वडील सलीम खान हे सुरक्षारक्षकासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा सलीम खान यांच्या एका सुरक्षा रक्षकाला एका बेंचवर एक पत्र दिसले. सुरक्षा रक्षकाने ते पत्र सलीम खान याना दिले.

दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अलीकडेच सरकारने सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली होती मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या