Bigg Boss 12 : लोणावळ्यात नाही

0
मुंबई : बिग बॉस-१२ आपल्‍या प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे यंदाही काहीतरी नवं घेऊन येत आहे. सलमान खानच्‍या या शोचा प्रोमो आणि लोगो रिलीज झाला आहे. सामान्यत: लोणावळा येथे बिग बॉस लॉन्‍च करण्‍यात येतं. परंतु, सूत्रांच्‍या माहितीनुसार, बिग बॉस लोणावळ्‍यात लॉन्‍च होणार नसल्‍याचे समजते.
बिग बॉस 12 बद्दल जी माहिती मिळत आहे. त्यामध्ये ही ओपनिंग सेरेमनी लोणावळ्याच्या ऐवजी गोव्यात होणार आहे. तसेच इथेच शो संदर्भातील प्रेस कॉन्फरन्स देखील घेण्यात येणार आहे. तसेच या पत्रकार परिषदेत शो तील स्पर्धक आणि कार्यक्रमातील वेगवेगळे नियम, खेळ सांगण्यात येणार आहे. बिग बॉस 12 हे सिझन 16 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. आता शो चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या शोमध्ये होस्ट म्हणून आपल्याला सलमान खान दिसणार आहे. या प्रोमोत इलेक्ट्रिशयन – रॅपर, सासू – सून, जुळ्या बहिणी आणि लहान – मोठ्या जोड्या असल्याच दाखवण्यात आलं आहे.

बिग बॉस १२ चे कंटेस्‍टेंट 

यावेळी कंटेस्‍टेंट हे कपल्‍स असतील. आई-वडिल, वडिल-मुलगी, भाऊ-बहिण, लेस्बियन आणि गे कपल सहभागी होतील. मिलिंद सोमन-अंकिता कोनवार, माहिका शर्मा-डेनी डी, प्रिया प्रकाश वारियर-रोशन अब्दुल, दीपिका सिंह-रोहित राज गोयल यासारख्‍या जोड्‍या बिग बॉसच्‍या नव्‍या सीझनमध्‍ये दिसू शकतात.

LEAVE A REPLY

*