भाईजान सलमान खान झळकणार रोहित शेट्टीच्या सिनेमात

0
मुंबई : सलमान खानच्या चाहत्यांसाठी हे वर्ष चांगलेच खास आहे. यंदा सलमानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. शिवाय वर्षाअखेर भाईजानचा ‘दबंग 3’ हा चित्रपटही चित्रपटगृहांत झळकणार आहे. ‘भारत’चा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना आता भाईजानच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. वृत्तानुसार, ‘भारत’ आणि ‘दबंग 3’चे शूटींग संपताच सलमान खानरोहित शेट्टीच्या चित्रपटात बिझी होणार आहे. होय, हे खरे आहे.

सुत्रांच्या सांगण्यानुसार रोहित शेट्टी आणि साजिद नाडियादवाला यांनी सलमान खानची भेट घेतली आणि त्याला सिनेमात काम करण्याचा विचार करण्यास सांगितले. ‘किक’ सिनेमात सलमान खानने देवी लाल सिंग (डेविल) ही भूमिका बजावली होती. सिनेमात सलमान खाकी वर्दीत चाहत्यांच्या भेटीस आला होता. याच सिनेमाला लक्षात घेत रोहित शेट्टीच्या सिनेमात सलमान खान पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

2010 मध्ये सलमानचा ‘दबंग’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच सिनेमाच्या दुसऱ्या भागाने सुद्धा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमान सध्या अली अब्बाज दिग्दर्शित ‘भारत’ सिनेमाचे काम पूर्ण करत आहे. त्यानंतर दबंग 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र असणार आहे. वर्षाअखेरीस रोहीत आणि सलमानची जोडी एकत्र काम करणार आहे.

LEAVE A REPLY

*