अखेर सलमानच्या ‘रेस 3’चा ट्रेलर रिलीज; ईदला होणार रिलीज

0
मुंबई : सलमान खान, बॉबी देओल आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या बहुप्रतिक्षित ‘रेस-३’ चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना ज्या दृश्यांची अपेक्षा होती, काहीसे तसेच दृश्य ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत बघावयास मिळतात. तुफान अ‍ॅक्शन सीन्समध्ये असणारे कलाकारांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी ‘रेस ३’ हा सलमानचा चित्रपट रमजानच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. पद्मावतनंतर २०१८ मधील हा दुसरा बिग बजेट सिनेमा आहे. तगडी स्टारकास्ट, आधीचे दोन ब्लॉकबस्टर भागांमुळे निर्माण झालेला ‘लॉयल’ प्रेक्षकवर्ग आणि सलमान खान या तीन गोष्टींमुळे हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे. या ट्रेलरमध्ये सलमान आपल्या हटके अंदाजात दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

*