Type to search

भाईजान’कडून कपिलला दिवाळीची खास भेट

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

भाईजान’कडून कपिलला दिवाळीची खास भेट

Share

मुंबई : कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर पुन्हा येण्यावरून चर्चेत आहे. पण कपिल आता पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री करणार आहे. तसेच अशी देखील चर्चा आहे की, कपिल शर्मा गर्लफ्रेंड गिन्नीसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. आता कपिल शर्माच्या बाबतीत एक मोठी रिपोर्ट आली आहे. कपिलच्या कॉमेडी शो ला आता सलमान खानचं प्रोडक्शन हाऊस प्रोड्युस करणार आहे.

अभिनेता सलमान खान याची स्वतंत्र निर्मिती संस्था आहे. त्यामुळे त्याच्या या प्रोडक्शन हाऊसमध्ये कपिलच्या आगामी शोची निर्मिती होणार आहे. त्यामुळे आता हा शो एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये होणार असल्यामुळे चाहत्यांना या शोविषयीची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

दरम्यान, सलमानच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या शोची निर्मिती होणार असल्यामुळे कपिलला भाईजानकडून हे दिवाळीचं गिफ्ट मिळाल्याचं म्हटलं जात आहे. कपिलचा हा शो येत्या १६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!