Type to search

‘दबंग ३’ च्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात

मुख्य बातम्या हिट-चाट

‘दबंग ३’ च्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात

Share
मुंबई : दबंग या चित्रपटात सलमान खानने साकारलेली चुलबुल पांडे ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटातील सलमानचे सगळेच संवाद गाजले होते. त्याचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. या चित्रपटातील सगळी गाणी देखील हिट झाली होती.

या चित्रपटाद्वारे सोनाक्षी सिन्हाने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर दबंग २ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ‘दबंग’ सिक्वल येऊन सात वर्षांहून अधिक काळ उलटला तेव्हापासून ‘दबंग ३’ येणार अशा चर्चा होत्या. आता जवळपास सात वर्षांनंतर हा चित्रपट येणार असल्याची माहिती सलमानचा भाऊ अरबाझ खान यानं दिली आहे.

एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून चित्रीकरणासाठी योग्य स्थळाच्या शोधात ‘दबंग’ची टीम आहे. प्रभू देवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे.

मात्र सलमाननं याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे. या चित्रपटाची कथा सध्या गुलदस्त्यातच राहू दे असं सलमाननं म्हटलं आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!