मनमाडमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री; खरेदीसाठी झुंबड

0
मनमाड(प्रतिनिधी): तीन दिवसाच्या संपानंतर आज मनमाड बाजार समितीमध्ये लिलावासाठी शेतकरी किरकोळ स्वरूपाचा भाजीपाला घेऊन आले होते.

आवक कमी तर घेणारे जास्त अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळाला.रविवारी मनमाडचं आठवडे बाजार असतो.

त्यात ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी विक्रीसाठी घेऊन येतात मात्र संपाचा फटका आठवडे बाजाराला ही बसला असून आज बाजारात नेहमी प्रमाणे दुकाने व गर्दी ही नसल्याचे चित्र होते.

LEAVE A REPLY

*