Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विक्रीकर अधिकार्‍यासह कर सल्लागार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Share
राहुरी खुर्द येथील महावितरण कार्यालयासमोर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांना तीन लाखांची खंडणी मागणार्‍या एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  व्यावसाय सुरू करण्यासाठी पत्नीच्या नावे काढलेला जीएसटी नंबर दंड न भरता बंद करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर विक्रीकर विभागातील विक्रीकर अधिकारी व खाजगी काम करणारा श्रीरामपूर येथील कर सल्लागार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे व्यवसाय सुरु करण्यासाठी जीएसटी नंबर डिसेंबर 2018 मध्ये काढलेला होता, परंतु काही कारणास्तव ते व्यवसाय सुरू करू शकले नाही. म्हणून त्यांनी सदर जीएसटी नंबर बंद करण्यासाठी कर सल्लागार श्री. हरदास यांच्यामार्फत ऑनलाईन अर्ज केला होता. सदर खात्यावर होणारा दंड न भरता खाते बंद करण्यासाठी कर सल्लागार हरदास यांनी विक्रीकर अधिकारी वस्तू व सेवा कर विभाग, अहमदनगर सुनील टकले यांच्यासाठी 3500 रुपये व स्वतःसाठी 500 रुपये कमिशन अशा 4000 रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. अहमदनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी श्रीरामपूर मधील हरीकमल प्लाझा परिसरात सापळा लावला. तक्रारदाराकडून नीलेश हरदास यांच्या कार्यालयात पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच रक्कम स्वीकारल्यानंतर अहमदनगर येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील आरोपी सुनील टकले यांनाही ताब्यात घेण्यात आले.

सदर सापळा कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे, वैभव पांढरे, अशोक रक्ताटे, हारून शेख यांच्या पथकाने पार पाडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!