वाहतूक नियंत्रकाच्या खिशातून एक लाख लंपास

0
साक्री । धुळ्याकडून साक्रीकडे येणार्‍या यावल- वापी बसमधून वाहतूक नियंत्रक अंकुश जिरे यांच्या खिशातील एक लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरटयाने लंपास केल्याची घटना आज घडली. घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी प्रवाशांची तपासणी देखील केली. मात्र काही मिळून आले नाही. साक्री पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यावल आगाराची बस (क्र. एमएच 20 बी.एल 2405) वापी कडे जात असतांना कुसुंबा येथुन साक्रीकडे जाण्यासाठी अंकुश संतोष जिरे हे बसमध्ये बसले होते. त्यादरम्यान त्यांच्या पँटच्या खिशातील एक लाख रुपये चोरीस गेल्याचे साक्री बस स्थानकावर उतरतांना त्यांच्या लक्षात आले.त्यांनी बस चालक आणि वाहक यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी बस स्थानकात बस थांबवून पोलिसांना बोलावून प्रवाशांची तपासणी केली. मात्र रक्कम मिळून आली नाही.

दरम्यान, अंकुश जिरे हे साक्री आगारात वाहतूक नियंत्रक या पदावर कार्यरत असून बँकेतून कर्ज घेऊन उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. साक्री शहरात बसने प्रवेश केल्यावर बसला दोन थांबे आहेत. या दोन्ही ठिकाणी काही तरुण उतरल्याने त्यांच्यावर संशय असून चोरीप्रकरणी अंकुश जिरे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*