Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नवीन नाशिक : सखुबाई आजींचा अनोखा विक्रम; १९६० ते २०१९ नॉनस्टॉप मतदान

Share

नवीन नाशिक | निशिकांत पाटील

शंभर वर्षीय सखुबाई चुंबळे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करत अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. सखुबाई यांनी 1960 पासुन ते आजपर्यंतच्या 2019 प्रत्येक विधान सभा निवडणुकीत मतदानाचा हक्क  न विसरता बजावला आहे. आजपर्यंतच्या सर्व 14 विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्या सांगतात.

देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच 1960 साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.21) झालेल्या 14 व्या विधान सभा निवडणुकीत,देवळाली विधान सभा मतदार संघातून गौळाणे ता. जि. नाशिक येथील सखुबाई नामदेव चुंभळे या आजीबाई यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 14 निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्या सांगतात.

मतदान करणे ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. आपला तो हक्क आहे. हा हक्क बजावणे हे लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी आवश्यक असते. त्यामुळे न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावला.

14 व्या विधान सभेसाठी सोमवारी सकाळीच नातु विश्वास चुंभळे यांच्यासोबत गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत हक्क बजावला असल्याचे त्यांनी सांगितले .

मतदानाने लोकशाही बळकट होते भारतीय लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा आपली लोकशाही मजबूत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारी असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. मतदानाशिवाय लोकशाहीला बळकटी येणे शक्य नाही. यामुळे 1960 ते 2019 या कालावधीत झालेल्या प्रत्येक निवडणुकीवेळी न चुकता मतदान केले.

वयाची शंभरी पूर्ण करणाऱ्या या आजीबाईनी मतदानाच्या दिवशी मतदान न करणाऱ्यांच्या गालात चपराकच लगावली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, या आजींचा आदर्श घेऊन मतदान करण्यासाठी बुथवर नक्की जा! असे अनेकजन आवाहन करत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!