मनमाड स्टेशनवर साकेत एक्स्प्रेसला आग; हानी टळली

0
मनमाड | फैजाबाद येथून -लोकमान्य टिळक टर्मिनर्सला जाणाऱ्या साकेत एक्सप्रेसच्या एस 11 या आरक्षित डब्यात शौचालयाजवळ आग लागल्याची घटना आज मनमाड रेल्वे स्टेशनवर घडली.

आग लागून धूर निघत असल्याचे पाहून प्रवाशामध्ये भीती पसरून पळापळ झाली. रेल्वे प्रशासनाने तातडीने घटना स्थळी धाव घेऊन फायर बाटल्यानच्या सहाय्याने फोमचा मारा करून आग विझवण्यात आली.

आग तत्काळ आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आग विझविण्यात आल्या नंतर सुमारे तासाभरानंतर साकेत एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली.

LEAVE A REPLY

*