Type to search

Featured जळगाव

video साकळी-शेगाव पदयात्रा : उद्या होणार श्रींचे दर्शन

Share

जळगाव –

साकळी (ता.यावल) येथील श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री संत गजानन महाराज फाऊंडेशन तर्फे आयोजीत साकळी ते श्रीक्षेत्र शेगाव पदयात्रेस दि.५ जानेवारी पासून प्रारंभ झाला आहे.

पदयात्रा उद्या दि.९ रोजी श्रीक्षेत्र शेगाव नगरीत दाखल होणार असून वारीतील भक्तगण श्रींचे दर्शन घेतील.

श्रीगजानन विजय ग्रंथ भेट

ज्या यजमानाच्या घरी पालखीचे पूजन व स्वागत होत आहे त्या यजमानास ‘गजानन विजय ग्रंथ व नामजप माळ’ भेट दिली जात आहे. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भजन, अभंग गात महाराजांचा जयघोष होत आहे.

पदयात्रेत हेमंत जोशी, गणेश जोशी, भुषण जोशी, राहुल कुलकर्णी, पितांबर बडगुजर, प्रसाद धर्माधिकारी, वासुदेव मोते, ईश्वर बडगुजर, प्रशांत मोते, ज्ञानदेव मराठे आदी भक्तगण सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत होत आहे.

 

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!