साईनगर रेल्वेस्थानकात नवीन फलाटासह जादा गाड्या देणार

0
शिर्डी (प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानच्या वतीने होणार्‍या साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त शिर्डीचे धार्मिक पर्यटन म्हणून नावलौवकिक मिळविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने शिर्डी रेल्वे स्थानकात नवीन फलाट (प्लॅटफॉर्म) व जादा रेल्वे गाड्यांसह योग्य त्या सर्व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भांबरे व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खा. सदाशिव लोंखंडे, संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम,
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, बिपीन कोल्हे, नगराध्यक्षा सौ. योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी केले तर आभार विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*