साईभक्तांची लूटमार झाल्यास संरक्षण विभागाकडून वसुली

0

डॉ. हावरे यांच्याकडून सुरक्षा विभागाला तंबी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा विश्‍वस्त व्यवस्थेच्या मंदिर परिसर, भक्तनिवास, भोजनालय तसेच अन्य ठिकाणी साईभक्तांची लूटमार झाल्यास त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या सिक्युरिटी एजन्सीकडून झालेल्या लूटमारीची रक्कम दुपटीने वसुली केली जाईल असे डॉ. सुरेश हावरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील काही महिन्यांपासून शिर्डीत येणार्‍या भक्तांच्या लूटमारीत वाढ झाली आहे. भक्त निवासात बंद खोल्यांचे कुलूप तोडून रोख रक्कम तसेच मौल्यवान साहित्याच्या चोर्‍या झाल्या आहेत.

याठिकाणी सिक्युरीटी गार्ड असताना चोर्‍या होतात ही मोठी गंभीर आणि चिंतेची बाब आहे. यामुळे दिवसेंदिवस साईंच्या शिर्डीत भाविक येण्यास घाबरत असल्याचे आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे. साईभक्त व शिर्डीचा मुख्य आधारस्तंभ असून तो केंद्रस्थानी आहे.

त्याची सुरक्षा सेवा देण्याचे काम व्यवस्थापनाबरोबर शिर्डीकरांचेही आहेत. काही साई भक्तांचे खिसे कापल्याने त्यांना परत जाण्यासाठी पैसे नसतात. साईभक्तांना खूप त्रास सहन करावा लागल्याच्या प्रतिक्रीया ऐकावयास मिळाल्या.
यामुळे साईसंस्थान विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी साई भक्तांची चोरी होईल त्या जागेवर नेमणुकीस असलेल्या सिक्युरिटी एजन्सीमार्फत चोरी झालेल्या रकमेच्या दुपटीने पैसे वसूल करण्यात येेतील.

तसेच पुन्हा त्याच जागेवर दुसर्‍यांदा चोरी झाल्यास चार पटीने पैसे वसुल करण्यात येईल. तिसर्‍यांदा चोरी झाल्यास त्या सिक्युरीटी एजन्सीला दिलेला ठेका रद्द करण्यात येईल असा निर्णय विश्‍वस्त व्यवस्थेने घेतला आहे.
या माध्यमातून भक्तनिवासात चोर्‍यांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच साईभक्तांना सुरक्षाही मिळणार असल्याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*