साईपादुका भारत भ्रमणासाठी रवाना

0

साईरथाचे गोव्याकडे प्रस्थान

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थानच्यावतीने साईबाबा समाधीचा शताब्दी सोहळ्यात साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून दि.13 ऑक्टोबर 2017 रोजी साईबाबांच्या पादुका साईभक्तांच्या दर्शनासाठी गोवा येथे जाणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या साईरथाची विधिवत पूजा संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय कोते, सौ. सरस्वती वाकचौरे, नगरसेवक अशोक गोंदकर, सुजित गोंदकर, नितीन कोते, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमे, अशोक औटी, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षीरसागर, मंदिर विभाग प्रमुख राजेंद्र जगताप, संस्थान कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईबाबांच्या समाधीस 18 ऑक्टोबर 2018 रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून यानिमित्ताने साईबाबा संस्थानच्यावतीने समाधीचा शताब्दी सोहळा दि.1 ऑक्टोबर 2017 ते दिनांक 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात दि.13 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2017 रोजी साई सेवा ट्रस्ट, गोवा प्रदेश यांच्यावतीने डॉ. शामा मुखर्जी स्टेडीयम, गोवा येथे भव्य असा पादुका दर्शन सोहळा, दि.15 ऑक्टोबर रोजी श्रध्दा पदयात्रिक मित्र मंडळ, कनकवली व दि.16 ऑक्टोबर रोजी साईबाबा पालखी सोहळा समिती,
कर्‍हाड येथे साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमासाठी साईबाबा संस्थानच्यावतीने भारत बेंझ कंपनीची 28.50 लाख रुपये किंमतीची ए.सी. बस खरेदी केली असून या साईरथातून साईबाबांच्या पादुका बुधवारी गोव्याकडे रवाना झाल्या आहेत.

साईसमाधी वर्षानिमित्त जगभरात साईबाबांच्या पवित्र पादुकांचे दर्शनासाठी नियोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गोवा राज्यातून होत आहे. बाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी साईबाबा संस्थानने एक चांगले पाऊल उचलले असून जगभरात ज्या ज्या ठिकाणी बाबांच्या पादुका जाणार त्या त्या ठिकाणी सबका मालीक एक तसेच श्रद्धा सबुरीचा संदेश पोहचणार आहे. शिर्डी ग्रामस्थ म्हणून आमचाही यामध्ये सहभाग आहे.
-विजय कोते, माजी उपनगराध्यक्ष शिर्डी

 

LEAVE A REPLY

*