Type to search

Featured सार्वमत

साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदमांचा राजीनामा

Share

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी मागील महिन्यात आपल्याला वयाची सत्तर वर्षे पूर्ण झाली असल्याने आपण संस्थानच्या उपाध्यक्ष पदाचा व विश्वस्त पदाचा राजीनामा देत असल्याचे विधी व न्याय विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानुसार शासनाच्या विधी व न्याय खात्याने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला असल्याचे 6 मार्च रोजी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे कळविले आहे.

दरम्यान साईबाबा विश्वस्त मंडळाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका संदीप कुलकर्णी व संजय काळे यांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली होती़ यावर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तीन महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला याचिकाकर्त्यांनी विश्वस्त मंडळाविरुद्ध पात्रतेबाबत घेतलेल्या आक्षेपावर त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करून पुनर्निरीक्षण करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी नेमली होती, या कमेटीत साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांचाही समावेश होता. या कमिटीने विश्वस्तांच्या पात्रतेबाबतचा अहवाल राज्यसरकारकडे सोपविला आहे.

तो अहवाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला कोर्टात सादर करण्याचे 24 फेब्रुवारीला आदेश दिले होते,या केसची सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ दोन दिवसांपूर्वी, 4 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने राज्य शासनाला न्यायमूर्ती वासंती नाईक यांच्या अहवालावर निर्णय घेण्यास सांगितले होते़ मात्र सरकारी वकिलांनी 4 मार्च रोजी युक्तिवाद करताना राज्य सरकार सदर अहवालावर 2 दिवसांत कारवाई करणार असल्याचे सांगितले . तसेच पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलेली होती़ या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व सरकारने मंजूर केला, राजीनामा देताना मात्र आपल्या वयाचे कारण पुढे केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!