Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

साईबाबा रुग्णालयातील थायरॉईड तपासणी मशीन तीन महिन्यापासून बंद

Share

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबांच्या रुग्णसेवेचा वसा चालवत असलेल्या साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लॅबोरेटरी विभागातील थायरॉईड तपासणीसाठी असलेले मशीन मागील 3 महिन्यापासून बंद असून धूळखात अवस्थेत आहे. याचा मोठा फटका सहन करावा लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून अनेक दुर्धर आजारावर हाताने उपचार करून अनेकांना चमत्कारिक दर्शन दिले आहे. त्यांच्या रुग्णसेवेचा वारसा आजही साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने शिर्डी शहरातील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय तसेच साईनाथ रुग्णालयात सुरू आहे. यामध्ये साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नाव राज्यातच नव्हे तर परराज्यात पोहोचले आहे.

अशातच रुग्णालयातील लॅबोरेटरी विभागातील थायरॉईड तपासणीसाठी असलेले मशीन तीन महिन्यांपासून बंद पडले असून याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य रुग्णांनी उपस्थित केला आहे. यामुळे हजारो थायरॉईड ग्रस्त रुग्णा 330 रुपये भरून खाजगीत तपासणी करीत आहेत. एकीकडे राजीव गांधी योजनेत लाभ मिळत असलेल्या गोरगरिबांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे संस्थानच्या कर्मचार्‍यांना मात्र मोफत उपलब्ध असल्याने फायदा होत असल्याचे समोर आले आहे.

या ठिकाणी थायरॉईड तपासणीसाठी दररोजचे किमान 10 रुग्ण येत असल्याचे खाजगी एजन्सीच्या टेक्निशियनने सांगितले. महिन्याला सरासरी दोनशे ते अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. साधारणपणे लाखो रुपयांची कमाई खाजगी एजन्सीला होत असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले आहे. सदरील मशीनची रुग्णालय प्रशासनाने वारंवार दुरुस्ती केली असून नवीन मशीन खरेदीसाठी प्रस्ताव मांडला आहे. मात्र व्यपस्थापन समितीची मंजुरी तसेच शासनाच्या न्याय विधी खात्याची मंजुरी अशा अनेक बाबींच्या अडचणी येतात. त्यामुळे रुग्णालयात 10 लाख रुपयांच्या आतील इमर्जन्सीसाठी लागणारी यंत्रणा खरेदी करण्याचे अधिकार येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!