Type to search

Featured सार्वमत

साई संस्थानला रिलायन्सकडून सव्वा कोटीचे सुरक्षा साहित्य

Share

शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या सुरक्षा व्यवस्थेकामी रिलायन्स इंडस्ट्रीज, मुंबई यांनी 1 कोटी 17 लाख 6 हजार 780 रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्य देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री. मुगळीकर म्हणाले, रिलायन्स इंडस्ट्रीज, मुंबई यांनी संस्थानला सुरक्षा व्यवस्थेकरिता 1 कोटी 17 लाख 6 हजार 780 रुपये किंमतीचे सुरक्षा साहित्य देणगी स्वरुपात दिलेले असून यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर 4 नग, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर 15 नग, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर 40 नग, रिपिटर व्हॅप 1 नग, वॉकी-टॉकी कंट्रोलर 1 नग, वॉकी-टॉकी (हॅण्ड हेल्ड ट्रान्स रिसीव्हर) 75 नग व वॉकी-टॉकी अतिरिक्त बॅटर्‍या 75 नग आदी सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे. त्यापैकी आजतागायत एक्स रे बॅग स्कॅनर 4 नग हे संस्थानला प्राप्त झालेले आहे.

उरर्वरित सुरक्षा साहित्य लवकरच संस्थानला प्राप्त होणार आहे. यापूर्वी हे साहित्य संस्थान खाजगी सुरक्षा कंपनीकडून भाडेतत्वावर वापरत होते. या देणगीमुळे संस्थानचे महिन्याकाठी भाडेतत्वावर खर्च होणारे सुमारे 5 लाख रुपये बचत होणार असल्याचे श्री. मुगळीकर यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!