Type to search

Featured सार्वमत

साई संस्थानचे 85 कंत्राटी कामगार 40 टक्के वेतनवाढीपासून वंचित

Share
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबा विश्वस्त व्यवस्थापन मंडळाने दोन वर्षांपूर्वी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या पगारात 40 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता आणि तो देऊही केला पण त्यातून 60 टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असणार्‍या 185 कंत्राटी कर्मचार्‍यांना वगळण्यात आले होते. दरम्यान पुढील सहा महिन्यांत 85 टक्के हजेरी भरल्यास तुम्हाला 40 टक्के वेतनवाढ देण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे या कर्मचार्‍यांनी 85 टक्के हजेरी भरवून दाखविली. त्यानुसार 100 कर्मचार्‍यांना 40 टक्के वेतनवाढ देण्यात आली. मात्र 85 कर्मचारी आजही वेतनवाढीपासून वंचित असून प्रशासनाकडून एकास एक न्याय आणि दुसर्‍यास एक सांगून आम्हाला कोण न्याय देणार या प्रतीक्षेत असून बाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या शिकवणीवर ठाम असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांना सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यत तुटपुंज्या पगारावर कंत्राटी कर्मचारी काम करत होते. व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. याबाबत कर्मचारी व संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त यांची बैठक झाली. त्यात कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मागे झालेल्या बैठकीत व्यवस्थापन मंडळाने गैरहजर असल्याचा कारणावरून कामावरून कमी केलेल्या 185 कर्मचार्‍यांना पुन्हा एक संधी द्यावी म्हणून कामावर घेण्याचा निर्णय घेतला. कंत्राटी कर्मचार्‍यांना 40 टक्के पगारवाढ देण्यात आली असून कुशल कामगारांना 13 हजार 420 तर अकुशल कामगारांचा पगार 12 हजार 151 रुपये देण्यात आला आहे. दरम्यान या 85 कंत्राटी कर्मचार्‍यांनी मागील दीड वर्षापासून साईबाबा संस्थानच्या कामगार विभागात वेळोवेळी संपर्क करून वेतनवाढ संदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र कामगार विभागकडून सातत्याने उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे कामगारांनी सांगितले. या विभागात चांगल्या दर्जाचे अधिकारी असणे काळाची गरज असून साईबाबा संस्थांनकडे आज मितीला कायमस्वरूपी आणि कंत्राटी असे एकूण साडेचार हजार कर्मचारी आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!